धैर्यशील पाटील, संसद रत्न सुप्रिया सुळे, प्रणितीताई शिंदे, शाहू छत्रपती यांना एक लाखाचं लीड द्या -- संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार

पंढरपूर प्रतिनिधी --
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना आणि एनयूबीसी वेस्टर्न भारतच्या वतीने मा. धैर्यशील मोहिते पाटील, संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे, आदरणीय शाहू छत्रपती, आमदार प्रणिती शिंदे, माननीय चंद्रहार पाटील, हातकणंगले मधून पाटील, तर साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला 
असल्या बाबतचे ए न्यू बी सी व शेतकरी संघटनेचे पत्र आज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे, संघटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे सदस्य किंवा अण्णा दरेकर, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत नलावडे, युवक अध्यक्ष महेश बिस्किटे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष दामाजी मोरे, पंढरपूर तालुका संघटक मारुती भुसनर, कालिदास गायकवाड, रहाटेवाडी चे बजरंग पवार व गिरीश पवार पदाधिकाऱ्यांनी माढा लोकसभा  मतदारसंघाचे उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्ती केले, यावेळी संघटनेचे अध्यक्षतेचा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्याशी महेश बिस्किटे यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून दिली त्यावेळी विठ्ठल राजे पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे सह संचरत्न सुप्रिया सुळे प्रणितीताई शिंदे शाहू छत्रपती यांच्यासह सर्वच उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत या चार उमेदवारांना एक लाखांपेक्षा अधिकच लीड द्या असे आवाहन त्यांनी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना केले यावेळी संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form