पंढरपूर-- प्रतिनिधी
अखंड शिंपी परिवारच्यावतीने सनई-चौघडा अर्थात गेट टु गेदर कार्यक्रम रविवार दि. 12 रोजी येथील संत मीराबाई मठ येथे उत्साहात संपन्न झाला.परिवाराचे प्रमुख ज्ञानेश्वर वडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. एकनाथ नामदास महाराज होते. यावेळी नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अतुल मानकर, नामदेव महिला परिषद महाराष्ट्रच्या उपाध्यक्षा व नामदेव महिला कार्यकारिणी सांगलीच्या अध्यक्षा स्वातीताई पिसे, नामदेव महिला परिषदच्या खजिनदार आणि नाशिक महानगर नामदेव सांस्कृतिक महामंडळच्या महिला उपाध्यक्षा अर्चना मानकर, बाळासाहेब आंबेकर सातारा, सुचिता महाडिक कोल्हापूर, महाराष्ट्र महिला विकास मंच, (पश्चिम महाराष्ट्र) सांगलीच्या मीनल कुडाळकर, तसेच अखंड शिंपी परिवारचे आधारस्तंभ नारायण धोंगडे, गायत्री गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मानवांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांना विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन येथोचित सत्कार करण्यात आला.
त्यांनी कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास म्हणाले, आजच्या धावपळीच्या काळात मुला-मुलींचे विवाह जमविणे ही बाब अवघड होत आहे. यासाठी अशाप्रकारचे मेळावे घेणे गरजेचे आहे. या माध्यमातून वधु-वरांच्या पालकांच्या गाठीभेटी होऊन विवाह जमविणे सोपे होत असल्याचे ते म्हणाले. मीनल कुडाळकर म्हणाल्या महाराष्ट्र महिला विकास मंचच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांनी फक्त चुल व मुल यापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यात अग्रेसर होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात ज्या व्यक्तींनी समाजासाठी विशेष योगदान दिले त्यांना जीवन गौरव पुरस्कार, ज्या महिलांनी प्रेरणादायी कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे अशा रणरागिनींना स्वयंसिध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सदर मेळाव्यात इच्छुक वधु-वरांनी उत्स्फुर्तपणे आपली नावनोंदणी केली.
शिरोमणी फाउंडेशनच्या म्हणजेच सनई चौघडा गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या सर्व सदस्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांनी पुरस्कार देऊन सन्मान केला. गायत्री लचके, नाशिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अतिशय सुंदर अशा आनंदमय वातावरणात ज्ञानेश्वर वडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अजय निकते, कायदेशीर सल्लागार अॅड. विनायक उंडाळे, शिवकुमार भावलेकर यांनी परिश्र घेतले.
Tags
सामाजिक वार्ता