५५ होर्डिंग्ज शहर व रेल्वे हद्दीत लावले आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून होर्डिंग्जचे स्ट्रक्चर ऑडिट त्वरित करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
पंढरपूर प्रतिनीधी--
मुंबई येथे घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग्ज च्या दुर्घटनेनंतर मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन बाबत मीटिंग आयोजित केली होती या झालेल्या मीटिंगमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज असतील त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, नगर रचना सहाय्यक सुहास झिंगे सोमेश धट लिपिक चिदानंद सर्वगोड मुकादम नवनाथ पवार व अतिक्रमण विभागाच्या टीमने शहरातील असलेल्या सर्व होर्डिंग्ज चा सर्व्हे करून ५ अनाधिकृत असलेल्या होर्डिंग्ज रात्री उशीर पर्यंत काम करून काढून टाकण्यात आल्या
तसेच रेल्वे हद्दीमध्ये व शहरांमध्ये उपेंद्र पब्लिसिटी आणि बाबा पेस्टींग यांनी55 होर्डिंग्ज लावले आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून लावलेल्या होर्डिंग्ज चे स्ट्रक्चर ऑडिट त्वरित करून सात दिवसात अहवाल सादर करावा तसेच जे बोर्ड स्ट्रक्चर ऑडिट नुसार लावली गेलेले आहेत ते काढून घेऊन तसा अहवाल सादर करावा तसे न केल्यास व काही दुर्घटना घडल्यास ते स्वतः वैयक्तिक जबाबदार राहतील अशा नोटिसा बजावण्यात आलेले आहेत संबंधित एजन्सी यांनी मुदतीत माहिती दिली नाही किंवा होर्डिंग काढून घेतले नाहीत तर त्यांच्यावर नगर परिषदेच्या वतीने कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती डॉ प्रशांत जाधव मुख्याधिकारी यांनी दिली
Tags
प्रशासन वार्ता