नाझरे प्रतिनिधी --
जगातील पहिली संसद अनुभव मंडपाचे निर्माते, समतेचा पाया रचणारे, पहिले समता नायक, स्त्री उद्धारक, दलितोधारक, थोर अर्थतज्ञ, थोर समाज सुधारक, थोर विज्ञानवादी कुशल राजकारणी, क्रांतीसुर्य, जागतिक महामानव, विश्वगुरू, जागतिक लोकशाहीचे जनक, जागतिक वचन साहित्याचे निर्माते, भारतात साडेनऊशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा पाया रचणारे, क्रांतिकारी विचाराचे प्रणेते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती नाझरे ता . सांगोला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
भक्ती हीच शक्ती मानणारे, श्रमाला स्वर्ग समजणारे, दिन दलित दुबळ्यांना आपले मानणारे, महात्मा बसवेश्वर यांची जयंती नाजरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच संजय सरगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. तसेच नाझरे चौकात व वीरभद्र मंदिरात ही संपन्न झाली. यावेळी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम व पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पुरोहित म्हणून रविराज स्वामी यांनी काम पाहिले. यावेळी वीरशैव समाज बांधव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Tags
सामाजिक वार्ता