पंढरपूर प्रतिनीधी--
सालाबादप्रमाणे यंदाही सोनार समाजातील उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा उद्या शनिवारी दिनांक 11में 2024 रोजी स्वराज सांस्कृतिक भवन,सगंमनगर, सातारा कोरेगाव रोड, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या मेळाव्यात परगावहुन येणाऱ्या समाज बांधवांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत प्रशस्त अशा ठिकाणी वधुवर व पालक परिचय मेळावा असून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत,पाहुणचार, शिस्तबद्ध नियोजन, उत्तम भोजनाची सोय, असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सातारा सोनार समाज सेवा संस्थेचे विशेष कौतुक केले जाते.
सदर वधुवर व पालक परिचय मेळावा सकाळी ठिक 9.30 ते संकाळी 5.30 पर्यंत कार्यक्रम असणार आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाजातील उपवर वधु वर व पालक परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
सामाजिक वार्ता