पंढरपूर प्रतिनिधी --
व्यापारी कमेटीच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दिनांक २३एप्रिल२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ६.१० मि. श्रीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्याकडून 'श्री' ची आरती करण्यात आली. भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, हत्तीची मिरवणूक काढण्यात आली.
तसेच दि.२४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वा 'श्री' ची छबिना मिरवणूक वैभवशाली दिमाखदार निघाली होती. गांवातील तसेच बाहेरगांवचे बँड पथक, हलगी पथकासह मिरवणूक निघाली. सदर मिरवणूकीत व्यापारी, तरूण सहभागी होते.
तसेच दि. २५ एप्रिल२०२४ रोजी नवीपेठ येथील विश्वनाथ औदुंबर म्हमाने यांनी बांधलेल्या कुस्ती आखाड्यावर कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाचे कुस्तीस चांदीची गदा व रक्कम रू. ५१,०००/- रोख असे बक्षिस ठेवले होते. सदर कुस्ती पैलवान रविराज चप्हाण, बाभुळगांव व पैलवान रोहित पवार, गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्यात होवून पैलवान रविराज चव्हाण हा विजयी झाला, त्यास व्यापारी कमेटी, पंढरपूर केसरी म्हणून घोषित करण्यात आले व त्यास चांदीची गदा व रक्कम रू. ५१,०००/- पदाधिकाऱ्याच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांक पैलवान रोहित पवार, गंगावेस तालीम, कोल्हापूर यांस रक्कम रु. ३१,०००/- रोख बक्षिस देण्यात आले व तृतीय क्रमांक पैलवान भोसले, शिवनेरी तालीम, अकलूज यांस रक्कम रु. २१,०००/- रोख बक्षिस देण्यात आले. तसेच रक्कम रू. १००/- ते १,०००/- च्या कुरत्या झाल्या. तसेच ७९ किलोच्या पुढील ओपन गट स्पर्धेत व्यापारी कमेटी केसरीसाठी ३४ कुस्त्या झाल्या. रविराज चव्हाण यास व्यापारी कमेटी केसरी म्हणून गौरवण्यात आले.
सदरचा उत्सव व कुस्त्या पार पाडण्यासाठी चेअरमन सोमनाथ आंबरे, अध्यक्ष पद्मकुमार गांधी, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, राहुल म्हमाने, संजय भिंगे, धीरज म्हमाने, राजकुमार प्रतापचंद गांधी, सचिन म्हमाने, भारत भिंगे, मुकुंद मर्दा, प्रदिपकुमार फडे, महावीर फडे, विजयकुमार परदेशी, सेक्रेटरी विश्वेश्वर भिंगे हे प्रयत्न करीत होते. कुस्त्त्यां बघण्यासाठी कुस्ती शौकींनानी मैदानावर गर्दी केलेली होती. पोलीस खात्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Tags
सामाजिक वार्ता