नाझरे प्रतिनिधी -
श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचाच सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे.
जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचा च नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराचे व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी ग्रामपंचायत तडवळे ता. आटपाडी येथे शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले . सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल. तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन ह भ प अनिल महाराज यांनी केले आहे.
Tags
धार्मिक वार्ता