पंढरपूर येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी --
संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कोणताही माय का लाल संविधान बदलू शकत नाही.भारत विश्व गुरू झाला पाहिजे व जगातील तिसरी महासत्ता झाला पाहिजे. यासाठी मोदी सरकार सत्तेत बसवा असे आवाहन केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारत हा देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे कृषी आधारित बहुमूल्य,बहुउपयोगी उत्पादने बनवून शेतकऱ्यांना समृध्द बनवायचे
आहे.शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा दाता, डांबरदाता व हवाई दाता बनला पाहिजे.याकरीता भाजप सरकार प्रयत्न करत आहे. यात यशही येत आहे.साखर कारखानदारीतून इथेनॉल उत्पादन होत आहे. तर इथेनॉवर चालणारे वाहन उत्पादन तयार केले जात आहे. क्रॉप पॅटर्न बदलत आहे,पर एकर उत्पादनात वाढ केली जात आहे. तर शेतीशी संबंधित दुग्ध दुग्ध उत्पादनातही नवनवे संशोधन करीत क्रांती घडवली जात आहे.शेतकर्याला समृध्द करतच देशात शिवशाही व रामराज्य आणण्यासाठी योग्य सरकारची गरज आहे आणि ते मोदी सरकार करणार असल्याची ग्वाही केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पंढरपूर येथे महायुतीचे भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते,माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर,सांगलीचे उमेदवार संजय मामा पाटील,धाराशिवचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ. समाधान अवताडे,माजी आ.प्रशांत परिचारक, आ. गोपीचंद पडळकर,शिवाजी सावंत, अनिल सावंत आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपला मत का द्यायचे हे सांगायला मी येथे आलो आहे. असे सांगत नितीन गडकरी म्हणाले की, महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. पण काँग्रेसच्या नीती व धोरणांमुळे नागरिक गावातून शहरात गेलेहे केवळ चुकीच्या धोरणामुळे. हे चित्र बदलवण्याचे भाजप ने ठरवल आहे. खेड्यातील शेतकरी समृध्द झाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. साखर कारखानदारांनी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉलसह विविध उपपदार्थ बनविणे गरजेचे आहे. पेट्रोल मध्ये २६ टक्के इथेनॉल वापरले जाते. येथील शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता आहे. शेतकरी डांबर दाता आहे.
टक्केवारी न घेणारा खासदार म्हणून सातपुतेंना पाठवा टक्केवारी घेणारा खासदार राम सातपुते होणार नाही. शेतकऱ्यांचा मुलगा आहे. याला निवडून द्या. तुमच्या आशा, स्वप्न, पूर्ण करण्यासाठी निवडून द्या. संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कोणताही माय का लाल संविधान बदलू शकत नाही. भारत विश्व गुरू झाला पाहिजे व जगातील तिसरी महासत्ता झाला पाहिजे. यासाठी मोदी सरकार सत्तेत बसवा असे आवाहन केले.
बायो डिझेलवरील जेट विमान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवाई दाता होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आम्ही समृध्द बनगणार आहे. इनोव्हा गाडी इथेनॉलवर चालते. इथेनॉल ६० रूपये लिटर आहे. साखर कारखानदारांनी इथेनॉल पंप टाकावेत. अनेक वाहन कंपन्या इथेनॉल चालणारी वाहन निर्मिती करत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे गावोगावचे रस्ते चकाचक झाले. पंढरपूर येथील रेल्वे चां उड्डाण पूल करणार आहे. विठ्ठल मंदिरा पर्यंत रस्ता करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवशाही व रामराज्य देशात आणणे हेच आमचं धेय्य आहे. याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. तर प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले.
Tags
राजकीय वार्ता