पंढरपूर प्रतिनीधी--
पंढरपूर शहर आणि तालुक्यात स्व. भारतनाना भालके गटाची मोठी ताकद आहे. पंढरपूर तालुका हा सोलापूर आणि माढा लोकसभा या दोन्ही मतदार संघात विभागला आहे. यापूर्वीच सोलापूर मतदार संघात आ.प्रणिती शिंदे यांना भक्कम पाठिंबा दिला होता. तर आता माढा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार आहे
माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिह निंबाळकर यांच्यात अतिशय चुरशीची लढत होत असून, उद्या यासाठी मतदान पार पडणार आहे.धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी माढा लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले पंढरपूर तालुक्यातील ५७ गावातील मतदार महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.या ५७ गावात विठ्ठल परिवाराशी संबंधित मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे हे महायुती सोबत आहेत.तर सुरुवातीच्या काळात मोहिते पाटील यांच्या समवेत असलेले अभिजित पाटील यांनी नुकताच भाजपला पाठींबा देत महायुतीचे उमेदवार रणजितसिह निंबाळकर यांचा प्रचारही सुरु केला आहे.विठ्ठल परिवारातील दुसरे नेते युवराज पाटील आणि गणेश पाटील हे मात्र शरद पवार यांच्या प्रति असलेली निष्ठेची परंपरा अबाधित ठेवली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारात नेटाने सक्रिय असल्याचे दिसून आले.तर आता विठ्ठल परिवारातील आणखी एक नेते भगीरथ भालके यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.भगीरथ भालके यांनी आपल्या काही प्रमुख समर्थकांशी चर्चा करीत शिवतेजसिह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात भगीरथ भालके हे पंढरपूर -मंगळवेढा शहर तालुक्यात आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आले होते.आता भगीरथ भालके यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिबा जाहीर केल्याने ५७ गावात विठ्ठल परिवारातील भालके समर्थक यांचे मोलाचे सहकार्य मोहिते पाटील यांना होईल असे मानले जात आहे.
Tags
राजकीय वार्ता