श्री विठ्ठल कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

पंढरपूर प्रतिनीधी--
 पंढरपूर दि. १० शुक्रवार दि.१०.०५.२०२४ रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शेती कमिटीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांचे शुभहस्ते गळीत हंगाम २०२४- २०२५ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराच्या अर्जाचे विधीवत पुजन करून ऊस तोडणी व वाहतूक कराराचा आजपासून शुभारंभ करणेत आला.

याप्रसंगी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, गळीत हंगाम २०२४- २०२५ साठी ज्या तोडणी वाहतुक ठेकेदारांना श्री विठ्ठल कारखान्याकडे करार करावयाचा आहे, अशा सर्व ठेकेदारांनी आपले अर्ज दि.११.०५.२०२४ पासून कारखान्याच्या शेती विभागाकडे वेळेत सादर करावेत. २०२४-२०२५ हंगामा करीता कारखान्याचे गाळप क्षमतेप्रमाणे गाळप करणे करीता ट्रक ट्रॅक्टर, डंपींग ट्रॅक्टर व बैलगाडी याप्रमाणे यंत्रणेचे करार करावे लागणार आहेत. कारखान्याकडे जास्तीत-जास्त ठेकेदारांनी करार करून पुढील हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे कारखाना प्रशासनाच्या वतीने आवाहन करणेत येत आहे. कारखान्याकडे ऊसाची नोंद झालेली असून उर्वरीत ऊस नोंदी घेण्याचे काम शेती विभागामार्फत चालू आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे शेती कमिटीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे, संचालक श्री दिनकर चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशेती अधिकारी नितीन पवार यांनी केले व आभार लिगल ऑफीसर ओमकार अवधुत यांनी केले.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, कालिदास साळुंखे, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, अशोक जाधव, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक घाडगे व उमेश मोरे, संघ मॅनेजर श्री धनाजी घाडगे यांचेसह कारखान्याचे सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form