पंढरपूर प्रतिनिधी--
नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने पंढरपूर येथील व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जाणारी आणि सर्व सुविधा व तत्पर सेवा ग्राहकांना देणारी सहकार क्षेत्रातील अग्रेसर बॅंक म्हणून ओळखली जाणारी दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर या बॅंकेला मोबाईल बॅंकींगची सेवा ग्राहकांना देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दि.पंढरपूर मर्चंट काॅ.र्ऑफ.बॅंक पंढरपूर ही ग्राहकांना मोबाईल सेवा देणारी पहिली बॅंक म्हणून मान मिळालाआहे.ग्राहकांना तत्पर सेवा देणारी,व हीत जपणारी बॅंक म्हणून ओळख असलेल्या या बॅंकेतील सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कार्यामुळे ही सेवा ग्राहकांना देण्याचा बहुमान मिळाला आहे.
दि.पंढरपूर मर्चंट काॅ.ऑफ.बॅंक पंढरपूर चे व्यवस्थापक, शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
Tags
सहकार वार्ता