पंढरपूर प्रतिनिधी--
भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यामध्ये अखेर पंढरपूरचा सस्पेंन्स सुटला आहे. पुन्हा समाधान आवताडे यांनाचं उमेदवारी देण्यात आली आहे.
यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा समाधान आवताडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपने विधानसभा निवडणुकीत यामध्ये काही ठिकाणी नवीन उदेमवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान आवताडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं प्रशांत परिचारक यांचा पत्ता कट झाला आहे. तर सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपने यापूर्वी 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा कली होती. त्यानंतर आज 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अखेर पंढरपूरचा सस्पेंन्स सुटला आहे. पुन्हा समाधान आवताडे यांनाचं उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं प्रशांत परिचारक आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ते पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.
Tags
राजकीय वार्ता