विधानसभा निवडणुकीत वसंतराव देशमुख यांचीही उडी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर (प्रतिनिधी)--
पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि जि.प.सदस्य वसंतराव दौलतराव देशमुख, यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केल्यामुळे, त्यांची राजकीय चाल वेगळीच असल्याची चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे.
सहा महिन्यापूर्वी त्यांच्या दिवसानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी कासेगाव येथे मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळीच त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे घोषित केले होते. उच्च न्यायालयाचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला होता. यावेळेस पासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा मतदारसंघात होत होती.
वसंतराव देशमुख यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गुरुवारी या पक्षाकडून भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर शुक्रवारी वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसेच अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, नाहीतर समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. वसंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे, यंदाची निवडणूक बहुरंगी होणार की काय, अशी चर्चा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात रंगू लागली आह
वसंतराव दौलतराव देशमुख हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. आजपर्यंत त्यांनी पंढरपूर पंचायत समिती, जिल्हा परिषद सोलापूर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना यासारख्या संस्थां आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. या जनसंपर्काच्या जीवावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास, मतदारसंघात वेगळे चित्र निर्माण होऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे
Tags
राजकीय वार्ता