निवडणूक खर्च निरीक्षक के.पी.जेयकर यांची नियंत्रण व समन्वय कक्षास भेट

                                                         

  

पंढरपूर दि.(३०):-  विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च  निरीक्षक के.पी. जेयकर यांनी आज 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील नियंत्रण व समन्वय कक्षास भेट देवून कामकाजाची पाहणी केली.


 यावेळी पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे,  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे, मदन जाधव, चरण कोल्हे, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी प्रशांत जाधव, सहा.नोडल अधिकारी सुनिल वाळूंजकर, संपर्क अधिकारी बाळासाहेब लांडगे उपस्थित होते. उपस्थित होते.

        

   

     निवडणूक खर्च निरीक्षक जेयकर यांनी  आचारसंहिता कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष, एक खिडकी कक्ष, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण, व्हिडीओ पाहणी पथक  या कक्षांस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेवून सूचना केल्या. तसेच चालू असलेल्या निवडणूक कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

            तद्नंतर निवडणूकीचे कामासाठी नियुक्ती केलेल्या सर्व पथकातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामधील सर्व निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर नियुक्त सर्व नोडल अधिकारी यांना  निवडणूक खर्च निरीक्षक जेयकर यांनी कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.

                      तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये यापुढेही  निवडणूक खर्च निरीक्षक यांचा पाहणी दौरा चालू राहणार असून, संपूर्ण विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च विषयक बाबींवर नियंत्रण ठेऊन ते आयोगास वेळोवेळी अहवाल सादर करणार आहेत, अशी  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी  दिली. त्याचबरोबर निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form