मोहिते पाटलांनी दिलेला शब्द पाळला - जयसिंह मोहिते पाटील
संग्रामनगर दि.२८ (केदार लोहकरे यांजकडून)
२५४ माळशिरस (अनु.जाती) विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जानकर यांच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असे सांगून आता जनतेने एक लाख एक हजार मतांचे मताधिक्य देवुन विजयी करावे असे आवाहन सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले .
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातुन उत्तमराव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी वेळापूर येथे श्री अर्धनारी नटेश्वराचे तर अकलूज येथे ग्रामदैवत अकलाई देवीचे दर्शन घेतले.
महापुरुषां बरोबरच शिवरत्न बंगल्यावर सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले. वेळापूर येथे पत्नी व माजी सरपंच विमल जानकर यांनी तर शिवरत्नवर नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी जानकर यांचे औक्षण केले .
माळेवाडी अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय अशी भव्य मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत जानकर यांनी जयसिंह मोहिते पाटील , खा.सुप्रिया सुळे,खा.धैर्यशील मोहिते पाटील व माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला .
विजय चौक येथे प्रचाराची सभा झाली त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माजी आमदार आर.जी.रुपनवर ,माणिकबापू वाघमोडे,माळशिरसच्या नगराध्यक्षा ताई वावरे,माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,मामासाहेब पांढरे,स्वप्नील वाघमारे,विकास धाईंजे,ॲड प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
*चौकट*
उत्तम जानकर -
चला विजयाचा फॉर्म भरु या उमेदवारी अर्ज दाखल केला.गेल्या ३३ वर्षे निवडणुका लढल्या.गेल्या दहा वर्षात पक्षात या अन्यथा जेलमध्ये जावा.मोहिते पाटील व आपण रणजितसिंह निंबाळकरांना निवडुन दिले. मागच्या निवडणुकीत राम सातपुतेला आमदार केले.मोहिते पाटील व आपले राजकीय वैर होते पण आपल्याच तालुक्यातला खासदार,आमदार व्हावा या हेतुने एकत्र आलो आहे.अनेकांना शंका होत्या पण निवडून दिले.बाळदादानी शब्द दिला होता.जीव गेला तर शब्दाला जागणारे मोहिते पाटील कुटुंब.मी तरुण आहे .आम्ही चुकीच वागू तिथे न्याय निवाडा करण्याच काम बाळदादा न्याय करतील.हा तालुका वैचारिक, विकासासाठी एकत्र येतो.दुप्पट मताने निवडून येवु .गाडीने पैसे वाटुन मते घेतली.पुढील २५ वर्षे उमेदवार म्हणून कोणी येणार नाही एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून द्या .
सुप्रिया सुळे -
फॉर्म भरायला नक्की उपस्थित राहीन असा शब्द दिला होता.संघर्ष करणारे , लढणारे टिकतात.सत्य परेशान हो सकता है पराजित नही.
चांगल्या वातावरणात उत्साहात फॉर्म भरला.नेते गेले कार्यकर्ते राहिले म्हणून जिंकले.विजयदादा व बाळदादांचा आशिर्वाद मिळवा व जिंका.माझ्या मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा केला . लेकी आणि नाती १५०० रूपये घेतले नाहीत.मन मोठ असावं लागत.संविधानाने देश चालतो. विजयदादा,बाळदादा,
पवारसाहेब लढले म्हणून यश प्राप्त झाले.शुभ कार्यालाच तुतारी,शिवाजी महाराजांनी युध्द पुकारले त्यावेळी तुतारीच वाजली.
आर.जी.रुपनवर -
पक्षभेद विसरुन व आपआपसातील भांडणे विसरुन तालुक्यातील जनतेने विकासासाठी एकत्र येण्याचा विचार बाळदादांनी मांडला त्याचे शिल्पकार बाळदादा आहेत.राज्यावर ९ लाख कोटी कर्ज आहे.शिंदेची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार आहे.
खा.धैर्यशील मोहिते पाटील -
वैचारिक बदल घडविण्याचा निर्णय बाळदादांनी घेतला आहे.एकमेकात भांडुन शक्ती वाया घालवण्यापेक्षा एकत्र येण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला.मी आणि उत्तमराव निरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून.एम आय डी सी मंजूर करुन आणली आहे.तालुक्यात उद्योग लवकरच आणु.पिलीव जिल्हा परिषद गटासाठी पाण्याचा प्रश्न आहे तो पण सोडवु.गाफिल राहु नका.
बाळदादा -
पाच वर्षात भयंकर त्रास दिला.तरी ही तालुक्याच्या विकासासाठी व आपलाच आमदार,खासदार व्हावा म्हणून एकत्र आलो.एक लाख एक हजाराचे मताधिक्य द्यायचे आहे. आपल ठरले आहे आता तुतारी घेतलेला माणुस निवडून आणायचा आहे.
Tags
राजकीय वार्ता