आकाशकंदील निर्मिती व पणती पेंटींग कार्यशाळा संपन्न...!
संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे यांजकडून)
दीपावलीचे औचित्य साधून कार्यानुभवातंर्गत विद्यार्थ्यांमधील हस्तकलेला उत्तेजन देण्याच्या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर (शेरी नं.१) येथे आकाशकंदील निर्मिती व पणती पेंटींग कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत अतिशय सुंदर आकाशकंदील तयार करुन व पणत्या रंगवून कलेचा आनंद लुटला.
या कार्यशाळेच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी सर यांनी विद्यार्थ्यांसमोर आकाशकंदीलाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह सादर केले.त्यानंतर विद्यार्थ्यांना साहित्य देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचे आकाशकंदील तयार करुन घेण्यात आले. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका रेशमा खान मॅडम यांनी पणती पेंटींग संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील विज्ञान शिक्षक पांडुरंग वाघ सर व प्रदीप कोरेकर सर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.या कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदील व पणत्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे मुलांच्या चहे-यावर एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला.या कार्यशाळेचे पालकांमधून कौतुक होत आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता