पंढरपूर प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीया पक्षाच्या दुसऱ्या यादीमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केली त्यावेळी ते म्हणाले की मी केलेल्या विकास कामामुळे मला पुन्हा एकदा मतदार निवडून देतील अशी मला खात्री आहे. असे मनोगत आमदार समाधान आवताडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या दुसऱ्या यादीमध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील उमेदवारी जाहीर करून त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याला कामाला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने त्यांना या ठिकाणातील उमेदवारी देऊन केलेली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले मला मिळालेला आमदारकीचा मोजका कालावधी, या कालावधीमध्ये मी अनेक विकास कामे या मतदारसंघांमध्ये आणलेले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न असो, तामदर्डी बंधाऱ्याचे काम असो, पंढरपूर शहरातील बेरोजगारांना हाताला काम मिळावे म्हणून एमआयडीसी मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न असो, असे असंख्य विकासकामे मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझे असंख्य मंत्री व कार्यकर्ते यांच्या पाठबळामुळे व त्यांनी दिलेल्या मला प्रोत्साहनामुळे मी हे विकासकामे करू शकलो. या मतदारसंघांमध्ये अजून अनेक कामे ही करायची राहिलेली आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. या विधानसभेच्या निवडणुक नंतर या मतदारसंघातील कोणतेही काम अपुरे राहणार नाही. याची ग्वाही मी आज तुम्हाला देतो.
Tags
राजकीय वार्ता