अनिल वेदपाठक सुवर्णकार सराफ मनीलेंडर्स यांच्या कालिका ज्वेलर्स या दालनाचे थाटात स्थलांतरित जागेत उद्घाटन...

अक्कलकोट प्रतिनिधी --
अनिल रामचंद्र वेदपाठक (कालिका) सुवर्णकार सराफ मनिलेंडर्स या फर्मचा सावरकर चौक मेन रोड अक्कलकोट  येथे स्वतःच्या मालकीच्या वास्तूचा वास्तुशांती विधी व  स्थलांतर उद्घाटन सोहळा पिठासन धर्माधिकारी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट व आळंदी देवाची पुणे येथील मा.श्री प्रसाद महाराज पंडित गुरुजी यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला .
   
स्वागत व प्रस्तावना कालिका उद्योग समूहाचे संस्थापक  चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले. तर प्रसिद्ध सुवर्ण कारागीर अनिल रामचंद्र वेदपाठक यांचा सर्व सराफ मंडळी व सर्व सुवर्णकार मंडळीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. अनिताताई अभय खोबरे, माजी नगराध्यक्ष अशपाक भाई मुस्तफा बळोरगी, माजी उपनगराध्यक्ष महेश चनबसप्पा हिंडोळे, गुरुनाथ नामदेव पोतदार, सोलापूरचे नरेश गोविंद रेवणकर, सराफ असो. चे अध्यक्ष सागर नवलचंद दोशी, ज्येष्ठ सराफ अरिंजय लिलाचंद गांधी,  सराफ विनायक शिवशरण बुदले, सराफ निनाद कैलास शहा, सराफ प्रवीण गुलाबचंद शहा, प्रसाद महाराज पंडित गुरुजी, वर्षाताई पंडित,या मान्यवरांचा कालिका उद्योग समूहाचे संचालक अनिल रामचंद्र वेदपाठक व  सौ. अश्विनी अनिल वेदपाठक यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
  
 उद्घाटन प्रसंगी प्रसाद महाराज पंडित, राजेंद्र हत्ते, प्रवीण शहा, सागर दोशी, महेश हिंडोळे या प्रमुख पाहुण्यांनी आपापले मनोगत व्यक्त करीत  गेल्या २८ वर्षातील सुवर्णकार अनिल वेदपाठक यांचा  प्रामाणिकपणे व सचोटीने आणि विश्वासाने  सोन्याचा दागिने बनविण्याचा कामाचा कौतुक केले, तसेच स्थलांतर प्रसंगी वेदपाठक परिवारास  शुभेच्छा दिले.
   
यावेळी सुरेश वेदपाठक, विठ्ठल वेदपाठक, राहुल वेदपाठक, ओंकार वेदपाठक, सौ. अंबुबाई वेदपाठक, सौ. शशिकला वेदपाठक, सौ.गंगुबाई वेदपाठक, शिरीष पंडित, विठ्ठल तेली, सौ. ऐश्वर्या वेदपाठक, सौ. लक्ष्मी वेदपाठक, रेशमा वेदपाठक, सागर वेदपाठक, सार्थक वेदपाठक पौरोहित्य श्यामराव पंडित, प्रमिला पंडित, अहिल्या पोतदार, प्रसन्न पोतदार, सौ. पार्वती यल्लाटीकर, संजीवनी सोनार, सह बहुसंख्या पाहुणे मंडळी, मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form