पंढरपूर प्रतिनिधी--
ओबीसी हा बीजेपीचा डीएन आहे असे बीजेपी पक्षाच्या वतीने सांगीतले जाते.तर माढा मतदार संघ भाजपला अनुकूल आहे.माढा आमदार संघात महायुतीने प्रस्थापितांना डावलून विस्थापितांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत संजय हाके पाटील यांनी केली.
महायुतीकडून धनगर समाजाला प्राधान्य देऊन उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होईल. असा आम्हाला विश्वास आहे.माढा विधानसभा मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे.तसेच बहुजनही मोठा आहे.याचा महायुतीने विचार करावा.
तसेच महायुतीने सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार जाहीर करताना धनगर समाजासाठी जागा सोडली नाही.तसेच महायुतीत माढा मतदार संघ हा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या असल्याने येथिल विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटातुन उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते आहे.यामुळे मी स्वतः व माऊली हळणवर महायुतीतुन माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे तसे महायुतीतील सर्व नेते यांच्याकडे आम्ही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Tags
राजकीय वार्ता