पंढरपूर प्रतिनिधी--
विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते परंतु महायुती व महाविकास आघाडीचे वरीष्ठ पातळीवर अनेक खलबत्ते झाले असल्याचे पहावयास मिळाले.अनेक नाट्य मय घडामोडी नंतर महायुतीने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी घोषित केले तर महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षित असा बदल घडविला आणि विठ्ठल व सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांना कॉग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली.तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी देखील भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली.
या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी सर्व प्रथम जाहीर झाली असल्याने ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जानकार राजकीय लोकांकडून महाविकास आघाडीने दोन उमेदवार दिल्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे.
*चारही उमेदवार तगडे*...
विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी विकास कामांच्या जोरावर आपण निश्चिंत विजयी होणार असल्याचे सांगतात तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांतील सर्व सामान्य जनतेचा सर्वांगीण विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या उमेदवारांचा पराभव अटळ असुन आपलाच विजय निश्चित असल्याचे भगिरथ भालके असे म्हणतात आणि मतदार संघाचे विकासाचे व्हिजन घेऊन मी जनतेसमोर जात आहे आणि मला देशाचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी बोलताना म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांतील सर्व सामान्य जनतेला गटा तटाचे राजकारणाचा विट आलाय त्यामुळे मला मतदार संघातील जनतेचा आर्शिवाद मलाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags
राजकीय वार्ता