मोहोळ विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने...तर अपक्ष एक माजी आमदार रिंगणात...

मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघात तिरंगी लढत...
पंढरपूर प्रतिनिधी--
(विनोद पोतदार )
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघात महायुतीने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आणि महाविकास आघाडी
कडून अनपेक्षित राजकीय  घडामोडी घडल्यानंतर त्यांनी विधानसभा जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजु खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी झालेल्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकताअसतानाच माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि पुन्हा दोनच दिवसांत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने उद्योजक राजु खरे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित करण्यात आले.यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार रमेश कदम यांनी अर्ज दाखल केला आहे.

यामुळे होऊ घातलेल्या मोहोळ राखीव विधानसभा निवडणूकीअतिशय अटीतटीचा सामना या मतदारसंघात पहावयास मिळणार आहे असे चित्र स्पष्ट दिसत आहे.मोहोळ 
तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेऊन राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली.अजित पवार गटाचे पूर्वाश्रमीचे मुख्य राज्य प्रवक्ते यांच्या राजकीय डावपेचा मुळेच सध्याच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. मोहोळ तालुक्यातील वजनदार निर्णयांक नेते, माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांचे भक्कम पाठबळ हेच आमदार यशवंत माने यांचे प्रमुख शस्त्र आहे. अनगरकर पाटलांना आपले पुढील राजकीय अस्तित्व बळकट करण्यासाठी  संघर्ष करावा लागणार आहे.असे चित्र आहे. कारण ज्या १२ वाड्यांचा नेहमी उल्लेख होतो त्याला पंढरपूर तालुक्यातील १७ गांवे ही पर्याय ठरणार आहेत. कारण या १७ गावांतील मतदार  जागरूक असल्यामुळे राजू खरे यांना ही राजकीय लढाई निर्णयांक ठरू शकते.

विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मतदार संघातील जनतेसमोर विकासा कामाच्या जोरावर आपण निश्चिंत विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.तर राजु खरे हे मागील काही वर्षांपासून मोहोळ विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याच्या व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी तन मन धन  माध्यमांतून मदत करीत जनता मला भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form