पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवप्रेमी चौक आठवडा बाजार सायंकाळी 5 वाजता असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजित केली असून या जाहीर सभेस संपूर्ण जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक युवती व सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान यावेळी आयोजकांकडुन करण्यात आले.
Tags
राजकीय वार्ता