पंढरपूर मंगळवेढा येथील जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अग्रहामुळे अनिल सावंत यांना उमेदवारी -- खा. धैर्यशील मोहिते-पाटील
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदारसंघ आहे. अनेक उमेदवार तुतारी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे उमेदवारीवरून बरेच दिवस पेच होता, पण इतर उमेदवारांसारखे चल बिचल व इकडे तिकडे न करता अनिल सावंत हे शेवटपर्यंत पक्षासोबत प्रामाणिक राहिले म्हणूनच त्यांना खा. शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. आणि अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांचा प्रचाराचा शुभारंभ माचणूर येथे सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी खा. मोहिते पाटील बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, सुधीर अभंगराव, रविंद्र मुळे, प्रथमेश पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, सुभाष भोसले, अण्णा सिरसट यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खासदार मोहिते पाटील पुढे म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदार
संघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणी केली आहे याचा गौप्यस्फोट मी येत्या काही दिवसात करणार आहे. भालके यांनी उमेदवारी संदर्भात प्रतीक्षा न करता पवार साहेबांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे. देशात हुकूमशाही सरकार आले असून महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. सगळ्या बाजूने हे सरकार आपली पिळवणूक करत असल्याचे दिसत आहे. राज्यात देशात एवढी महागाई वाढवली आहे. की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नुसती घोषणा बाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक करण्याचे काम महायुतीचे सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जाती धर्मात जातीय तेढ निर्माण करून भांडणे लावली जात आहेत. अशा सरकारला पायउतार करून जागा दाखवून देण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री अजून दिला नाही. प्रत्येक कार्यालयात टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. हुकूमशाही निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे हे सर्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन त्यांनी केले.
विठ्ठल कारखाना अडचणीत येईल तेव्हा शरद पवार मदत केली म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला, मंगळवेढा पंढरपूर ही जागा राष्ट्रवादीची असताना भालके यांनी गद्दारी केली. त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. अनिल सावंत एकनिष्ठ राहिले व पंढरपूर मंगळवेढा येथील जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अग्रहामुळे अनिल सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे २००९ ची चूक आता सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार अनिल सावंत म्हणाले की, महाविकास आधाडीकडून अधिकृत उमेदवारी मला आपली सेवा करण्यासाठी मिळाली आहे. पक्षाने व शरद पवार साहेबांनी व खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. मी कायम जनतेत मिसळून काम करणार आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, मी विकास करून दाखवणारा आहे, मी माझ्या कामातून विजय मिळवून विजयाचा गुलाल घेऊनच मुंबईला व बारामतीला जाईल, महिलांसाठी सर्व योजना व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात मोठा प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व गावातील अडीअडचणी जाणून त्या अडचणी सोडवून विकास करण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन सावंत यांनी केले.
यावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. राहुल शहा म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. पूर्वीपासून हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्वित आहे. प्रस्तावित चंद्रशेखर कोंडुमैरी यांनी मांडले तर सूत्रसंचालन शाम गोगाव यांनी यांनी केले,
Tags
राजकीय वार्ता