आजी माजी आमदारांचे कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत...
पंढरपूर प्रतिनिधी--
महायुतीचे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचणुर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर येथे प्रशांत परिचारक यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सभेस संबोधिताना महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी आर.पी.आय,(अ), रयत क्रांती व मित्र परिवार व घटक पक्षांचे नेत्यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.तर जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्याची चिंता करण्याची गरज नाही असे सांगून त्यांनी आमदार समाधान आवताडे यांना आश्वाशीत केले तर समाधान आवताडे यांनी मागील निवडणुकीत परिचारक यांच्या आशीर्वादाने विजयी झालो होतो असे सांगून त्यांनी यावेळी सुध्दा त्यांनी मला संपुर्ण सहकार्य करणार आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.असे ते म्हणाले
याप्रंसगी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या तसेच भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते, व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
राजकीय वार्ता