अनेक विधानसभा निवडणुका होऊनदेखील अद्यापही मंगळवेढा तालुका दुष्काळी.. ही लाजिरवाणी गोष्ट -- राज ठाकरे

लाडकी बहीण योजना देताना लाडका भाऊ आठवला नाही का?
मंगळवेढ्याच्या सभेत राज ठाकरे यांचा सरकारला सवाल

पंढरपूर प्रतिनिधी--
लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजना देताना लाडका भाऊ आठवला नाही का, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मंगळवेढा येथे पंढरपूर विधानसभा मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कित्येक वेळा विधानसभा निवडणुका होऊनदेखील अद्यापही मंगळवेढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आजपर्यंत ज्यांना निवडून दिले आहे, त्यांनी फसवले आहे. रोजगार निर्मिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांचे लोंढे शहराकडे जात आहेत. ज्या लोकांना तुम्ही
मंगळवेढा येथे प्रचार सभेत बोलताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे.आमदार, खासदार केले त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे ही विदारक परिस्थिती झाली आहे. आमदार, खासदारांची घरे पुणे, मुंबईला असून केवळ निवडणुकांपुरते लोकांत मिसळतात. एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, महिला, तरुणी सुरक्षित नाहीत. गेल्या साठवर्षांपासून ठराविक मुद्द्यांवरच निवडणुका लढवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जाते आहे. त्यांना त्याचा जाब विचारणे गरजेचे होते, परंतु तुम्ही त्यांना जाब विचारला नसल्याने तुमची अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form