सोलापुर येथे पांचाळ सोनार समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन....

पंढरपूर प्रतिनिधी--
पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा, सोलापूर यांनी रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता निर्मिती लॉन्स, आमंत्रण हॉल, विजापूर रोड, सैफुल चौकाजवळ सोलापूर या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष वसंत पोतदार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

तसेच या आयोजित  सामाजिक उपक्रमास अनमोल सहकार्य असणारे मोहन मंद्रपकर, संजय मैदर्गीकर, उमेश कुरुलकर, संतोष कळमणकर वसंत पोतदार अध्यक्ष, विजयकुमार पोतदार उपाध्यक्ष, दत्तगुरु वेदपाठक सचिव, गिरीश जमखंडीकर सह सचिव, गजानन सोनार कोषाध्यक्ष, इंजि. विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा दोडमनी, प्रा. अमर दीक्षित, सतीश जेऊरकर, इंजि. प्रकाश तपासे आदी मान्यवर मंडळींनी या मेळाव्यात समाजातील उप वर वधुवरासह  पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

विवाहासाठी मुली मिळत नसल्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात वाढलेला आहे. या प्रश्नाकडे समाजाचेही दुर्लक्ष होत आहे.यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आम्ही आयोजन केले असून यासाठी वधू वर नाव नोंदणी शुल्क रुपये ५००/- असेल. तर सोलापूर येथील मेळाव्याला महाराष्ट्रातूनच नव्हे तर लगतच्या कर्नाटक प्रांतातील विजापूर, कलबुर्गी, जमखंडी, बेळगावी तसेच आंध्र प्रदेशातील हैद्राबाद, येथील मराठी भाषिक उपवर, वरवधूचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. 

त्यामुळे सर्व क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी बघायला मिळतील. करिता स्वतः वधू वरांनी व पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. 
तसेच या मेळाव्यात विधवा, विधुर, घटस्फोटीत स्थळे बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी एकाच छता खाली योग्य स्थळ मुला मुलींना भेटू शकेल आणि खर्ची होणारा वेळ, पैसा वाचू शकेल. तरी सर्व समाज बांधवानी या सत्कार्यात सहभागी होऊन जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत ही माहिती पोहचवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
--------
अधिक माहितीसाठी व समाज बांधवांनी संपर्क साधावा यावा यासाठी खालील मोबाईल नंबर देत आहोत.
मोहन मंद्रूपकर ९४२२३८०७१२, संजय मैंदर्गीकर ९८२२६६८६९०, उमेश कुरुलकर ९८२२८८१०८७, संतोष कळमणकर ९८५०१३६०६१ वसंत पोतदार ९४२३०६५९१५ विजयकुमार पोतदार ९०४९९९६९४६, गजानन सोनार ९५४५१३४०५४
------- 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form