पंढरपूर प्रतिनिधी--
मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी व मंगळवेढा तालुका दुष्काळ ग्रस्त ही ओळख पुसण्यासाठी मनसेचाच उमेदवार निवडून द्यावा लागेल असे मत पत्रकारांशी संवाद साधताना मनसे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी वक्तव्य केले.
आज पर्यंत झालेल्या कित्येक विधान
सभाच्या निवडणूका मध्ये या आजी माजी आमदारानी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्याचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे. बेरोजगार युवकांना हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. आवश्यक असताना या बाबतीत येथील नेत्यांनी राजकारण केले गेल, मंगळवेढा तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय नाही.त्यामुळे या भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता व उच्च शिक्षणासाठी अन्यत्र जात आहे. या मंगळवेढा तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय मनसेच्या माध्यमातून केली जाणार आहे. युवकांना आय. टी. पार्कची सोय, उद्योग धंदे, कारखाने इ. युवकाच्या हाताला काम देणारे ऊद्योग मनसेच्या वतीने उभे केले जाणार आहे. महिलांना घरात बसून गृह उद्योग साठी मदत व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बेरोजगार युवा युवतीसाठी नौकरी व उद्योग व्यवसायसाठी मनसे तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येईल.
मनसे कोणत्याही जाती पातीचे राजकारण करत नाही मी स्वतः स्वखर्चातून हिंदू मशान भुमी असो अथवा मुस्लिम दफन भुमी दुरूस्ती केली, रस्ता केला आहे मी पहिले काम करतो मग सांगतो.कोरोना काळात अनेक कुटुंबांना मदत केली, पंढरपूर नगरपरिषदेचे टॅक्स बाबत असो, लाईट बिल वाढ असो,कोरोना काळातील बचत गट,बैका, पतसंस्था यांच्या पठाणी वसुलीस मनसे पायबंदी केली जन आंदोलन उभे केले जनतेने मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतदान रुपी आशिर्वाद दिला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले आहे.
Tags
राजकीय वार्ता