पंढरपूर प्रतिनिधी--
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे युवा नेते भगिरथदादा भारत भालके यांनी सदिच्छा भेट घेतली, दादांना पाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करून विविध विषयावर चर्चा केली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी आज संघर्ष योध्दा मनोज जंरागे पाटील यांच्या भेटीसाठी आज ते प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह भेट घेतली.
या वेळी मनोज जरांगे पाटील यांचा भगिरथदादा भालके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी भगीरथ भालके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचीही यावेळी भेट घेतली.
Tags
राजकीय वार्ता