पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौऱ्यास गावातील सर्व सामान्य नागरिक, युवा युवती, महिला शेतकरी वर्ग,व्यापारी व कै.भारत (नाना)भालके यांच्या स्वाभिमानी विचारांची जनता याचां उस्फुर्त प्रतिसाद दिसून येते आहे.यावेळी अनेक गावात त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी भगिरथ भालके यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, मतदार संघातील स्वाभिमानी जनता जन आशिर्वाद योग्य व स्वाभिमानी उमेदवारयालाच आशिर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.मी सर्व सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असुन विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते असुन मला मोठ्या मताधिक्यने जनता विजयी करतील, यावेळी महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत भालके यांना बोराळे ता.मंगळवेढा येथिल ग्रामस्थांच्या वतीने निवडणुकीकरिता 9,999 रुपये देणगी देण्यात आली.
गावभेट प्रचार दौरा दरम्यान मुढेवाडी,
तामदर्डी,तांडोर, सिद्धापूर,अरळी, नंदुर, डोणज, बोराळे या गावामध्ये जनतेशी त्यांनी आपली व पक्षाची भूमिका मांडली या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
*चौकट*
स्वाभिमानी पंचसूत्री महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असता शेतकरी वर्ग,
महिला,युवा युवती साठी बेरोजगार भत्ता, शैक्षणिक सुविधा, सर्व सामान्य नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, तसेच आरोग्य सेवा सुविधा,शेतकरी कर्जमाफी योजना, आरोग्य विमा योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ,आदी योजना जनतेपर्यंत पोहचविण्या
साठी मी काम स्वाभिमानी विचारांचे समाजात कारण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Tags
राजकीय वार्ता