नुकसानीसाठी 33 लाखापर्यंत भरपाई मिळाली,दोन वर्षापूर्वी कालवा फुटल्याने, मतदार संघातील शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान
मोहोळ प्रतिनिधी--
जानेवारी २०२३ मध्ये उजनी डावा कालवा फुटल्याने मोहोळ तालुक्यातील पाटकुल परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पैसे त्वरित द्यावेत अशी आग्रहाची मागणी मोहोळचे आ. राजू खरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत केली होती.त्यावेळी येत्या आठ दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.त्यामुळे राजू खरे यांच्या पाठपुराव्याने 330 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चा प्रश्न मार्गी लागला आहे. जवळपास 32 लाख 77हजार 240 रुपये सोलापूरचे अधीक्षक अभियंता याचे खात्यात जमा झाले असल्याचे आ. राजू खरे यांनी सांगितले आहे.
उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर दि 29 जानेवारी 2023 मध्ये पहाटे सहा वाजता पाटकुल तालुका मोहोळ
विटे आणि फुलचिंचोली ता पंढरपूर येथील साखळी क्रमांक ११२/ ६५० या ठिकाणी उजनी डावा कालवा अचानक फुटला .कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधीची नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरून गेल्या ,अनेकांच्या विहिरीवर बोरवेल गाळाने भरल्या ,ठिबक सिंचन, इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या तर एका शेतकऱ्याचे घर पडले . अर्ध्या तासाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.हि घटना घडल्यानंतर तात्कालिक आमदार, खासदार विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी, कारखान्याचे अध्यक्ष यांनी संबंधित ठिकाणी भेटी देवून पहाणी केली. फोटोसेशन झाले. मात्र पुन्हा या नुकसानीची कुणी चौकशी केली ना पाठपुरावा केला. साधे विचारपूस करायला फिरकले सुध्दा नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न दोन वर्ष शासकीय फायलीत गुंडाळून गेला होता.मात्र आ.राजू खरें यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात यावर पोटतिडकीने आवाज उठविला. यामुळेच प्रश्न सोडविण्याचा पहिला मान बळीराजाला मिळाला आहे.यामुळेच शेतकऱ्यांचा खरा कैवारी असल्याचे दाखवून दिले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या आठ दिवसात संबंधित नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार 8जानेवारी रोजी या विभागातील प्रमुख अधिकारी आणि आ. राजू खरे यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीतच निधी जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे तंतोतंत पालन करीत बैठक संपन्यापूर्वीच सदरचा निधी खात्यात जमा झाला आहे. ही बाब म्हणजे आपल्या पाठपुराव्यास मिळालेले पहिलेच मोठं यश असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
मागील दोन वर्षांपासून आपल्याला नुकसान मिळवून देण्यासाठी कोणी पुढे आले नाही. मात्र अगदी पहिल्याच महिन्यात आपले नूतन आणि कार्यतत्पर आमदार असलेले आ. राजू खरे यांनी पहिल्याच प्रयत्नात आपल्याला न्याय मिळवून दिला.याबाबत शेतकऱ्यांतूनही आ.खरे यांचे आभार मानले जात असून माजी लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय कारभारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील दोन दिवसापूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर, कार्यकारी संचालक रजपूत, सचिव संजय बेलसरे, प्रकल्प संचालक राजेंद्र मोहिते, आदिसह जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संभाव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आ. राहूल कुल, आ. अभिजित पाटील,आदी उपस्थितीत होते.
--------------------------------------------------
*आ.राजू खरे यांच्या हस्ते होणार वाटप*
वरील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. खरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. यामुळेच या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईचे चेकचे वाटपही आ. राजू खरे यांचेच हस्ते करण्यात यावेत आशा सूचनाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
Tags
राजकीय वार्ता