सोलापूर प्रतिनिधी --
लायन्स क्लब सोलापूर सिटी व सोलापूर जिल्हा तायक्यांदो स्पोर्ट्स कौन्सिल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त आदर्श पत्रकारांचा सन्मान सोहळा सोलापूर येथील विणकर बागेत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल ॲड .मल्लिनाथ पाटील, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सिद्धेश्वर बँकेचे संचालक प्रकाश हत्ती, समाजसेवक व उद्योजक प्रल्हाद काशीद उद्योजक प्रदीप वेर्णेकर, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी व सोलापूर जिल्हा तायकांदो स्पोर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स कौशल चे सेक्रेटरी मनझुर शेख,सचिव सोमेश्वर भोगडे आदी मान्यवर यावेळी राजश्री तडकासे उपस्थित होते.
यावेळी आदर्श पत्रकार म्हणून पत्रकार प्रशांत माळवदे यांना शाल,मोती हार,नौपकिन गुच्छ,सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मोहन भूमकर म्हणाले की, आपल्याला पत्रकारांच्या मुळेच शहरात,जिल्ह्यात,राज्यात ,देशात काय चालले आहे ते समजते.पत्रकारांना समाजातील चांगल्या,वाईट बातम्या द्याव्या लागतात.त्यामुळे त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.असेही भूमकर म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी यळमेली यांनी केले तर आभार सोमेश्वर भेगडे यांनी मानले.यावेळी पत्रकार,ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
सामाजिक वार्ता