पंढरपूर प्रतिनिधी--
दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी, सचिन सूर्यकांत बागल युवा उद्योगपती गादेगाव यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे यांना ४३ इंची, उच्च दर्जाचे दोन टी.व्ही.संच सप्रेम भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांना दृकश्राव्य शैक्षणिक साधनांचा अनुभव देता यावा विद्यार्थ्यांना बाह्य जगाचे ज्ञान अवगत व्हावे त्याचप्रमाणे हसत खेळत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पडावी याकरिता उद्योगपती सचिन सूर्यकांत बागल यांनी सामाजिक जाणीवेतून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे येथील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एक उपयुक्त गरजेची भेट स्वखर्चातून दिली.यासाठी आंबे ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे यांचे वतीने सचिन बागल यांचे मनःपूर्वक आभार.
Tags
शैक्षणिक वार्ता