पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर,स्वेरीज कॉलेज कॅम्पसचे संस्थापक सचिव डॉ.
बी. पी. रोंगे सर व पंढरपुरातील नामवंत बिल्डर कॉर्नर चे इंजि. सलीम भाई बोहरी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील लायसन्सड इंजिनीयर असोसिएशन चे दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांच्या हस्ते नगरपालिका येथे करण्यात आले. याप्रसंगी सुनील वाळूजकर यांनी असोसिएशनच्या कामाचे व इंजिनिअरच्या नगरपालिका विकासासाठी असणारे योगदान हे बहुमूल्य आहे असे यानंतर वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीज कॉलेज कॅम्पसचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर व पंढरपुरातील नामवंत बिल्डर कॉर्नर चे इंजि. सलीम भाई बोहरी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. सारंग कोळी, सचिव इंजि. सोमनाथ काळे, खजिनदार इंजि. सचिन माळवदे, सहअध्यक्ष इंजि. राजकुमार आटकळे, आर्किटे्ट बाळ कुंभार यांच्या वतीने पार पडला.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. सारंग कोळी यांनी स्वागत मनोगत व्यक्त केले. त्यांनी मागीलवर्षी प्रमाणे यावेळीही प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडत असून असोसिएशनचे पंढरपूर शहर व परिसर मध्ये महत्त्व पटवून दिले. तसेच असोसिएशनची एकता व बंधुताही अधोरेखित केली.
सोहळ्याला खरे महत्त्व प्राप्त झाले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वेरीज कॉलेज चे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर यांच्या मनोगताने. सरांनी त्यांची स्वेरी संस्था शून्यातून कशी निर्माण केली व त्याची आव्हाने वा अडचणींवर कश्या प्रकारे मात केली याचेही प्रबोधन केले.
तसेच लायसन्सड इंजिनीयर असोसिएशनचे शहराच्या विकासासाठी अमूल्य योगदान पटवून दिले. सरांनी अडचणींवर मात करण्यासाठी थॉट टाईम नेवर लास्ट ,बट थॉट पीपल डू' या पुस्तकाचे कश्या प्रकारे प्रेरणा घेऊन मदत झाली हे त्यांनी नमूद केले. तसेच असोसिएशन चे पुढील कार्याबद्दल शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे पाहुणे बांधकाम व्यावसायिक दुकानदार व पंढरपुरातील बिल्डर कॉर्नर चे ज्येष्ठ इंजि. सलीम भाई बोहरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व असोसिएशनला शुभेच्छा दिल्या.
असोसिएशन तर्फे 'अल्ट्राटेक व सोलापूर कन्सल्टिंग इंजिनियर असोसिएशन चे वतीने दरवर्षी घेण्यात.
आलेल्या आऊटस्टँडिंग काँक्रीट स्ट्रक्चर अवॉर्ड २०२५ प्राप्त झालेल्या असोसिएशनच्या मेंबर्स चे सत्कार ही प्रमुख पाहुणे यांच्या वतीने पार पडला. त्यामध्ये पुरस्कार प्राप्त झालेले सब-कॅटेगरीमध्ये आय जी बी सी नेक्स्ट प्लस ॲवॉर्ड' इंजि. प्रवीण जगताप यांचा सत्कार तसेच सब-कॅटेगरीमध्ये सबस्टेबल प्लॅनिंग अँड एम्पलिमेंटेशन ॲवॉर्ड' इंजि. महेश शहा व आर्किटे्ट यतिन गांधी यांचे सत्कार करण्यात आले.
दिनदर्शिकाचे वितरण कॅलेंडरचे सर्व जाहिरातदार व व्यापारी तसेच सर्व सभासदांना करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन असोसिएशन चे सचिव इंजि. सोमनाथ काळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. ललितकुमार पाटील-पुजारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी खजिनदार सचिन माळवदे,उपाध्यक्ष राजकुमार आटकळे, सहसाचिव अमित लाडे सदस्य जितू बत्रा,भारत ढोबळे, हणमंत खिलारे,संतोष कचरे,पांडुरंग अलोणी व सर्व मेंबर्स यांनी मोठे योगदान दिले.
Tags
सहकार वार्ता