नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देव यात्रा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा....

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ग्रामदैवत सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून ही यात्रा पौष महिन्यातील महिनाभर चालते विशेषतःपौष महिन्यामधील रविवारी या यात्रेस अधिक महत्त्व असते दर रविवारी पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाचे अतिप्राचीन मंदिर असून हे मंदिर पुरातन हेमाडपंती आहे स्थापत्य रचनेतील हा अद्भुत कलेचा नमुना आहे .
कोणार्क नंतर देशातील एकमेव असे महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाचे मंदिर असून विशेषतः पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी देवाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो 19 जानेवारी हा पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. 
या यात्रा काळात दर रविवारी सूर्यनारायण देव ट्रस्ट व ग्रामस्थ व महाप्रसाद अन्नदाते यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच पालखी सोहळा पार पडण्यासाठी सूर्यनारायण देव ट्रस्ट व संचालक मंडळ, नारायण चिंचोली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तरुण वर्ग ग्रामस्थ हा पालखी सोहळा पार पडण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभते .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form