पंढरपूर प्रतिनिधी--
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यावर येणारा मानसिक व शारीरिक ताण पाहता पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघ व डॉ.काणेज सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत डॉ. कणेज सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कराड रोड पंढरपूर येथे करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश सुडके, डॉ. सुरेंद्र काणे, डॉ. सुजाता काणे उपस्थित राहणार आहेत.
या सर्व रोगनिदान शिबिरामध्ये हृदय तपासणी, हाडातील कॅल्शियमची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी याचबरोबर सर्व आजाराचे निदान करण्यासाठी लिपिड प्रोफाइल रक्ताची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी रात्री १० ते सकाळी १० वाजेपर्यंत अन्न व पाणी घेऊ नये तरी वरील सर्व आरोग्याची तपासणी करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता