पंढरपूर प्रतिनिधी--
मराठा समाजाचे नेते बापु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरीतील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेसमोर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड वर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, त्याचे पंढरपुरात दोन वाडे आहेत तसेच राज्यातील इतर भागातही कोट्यावधींची माया त्यानं जमा केलीय. त्याची ही सर्व संपत्ती शासनानं शासनजमा करून घ्यावी. ज्या पध्दतीने सरपंच संतोष यांची क्रुरपणे हत्या केली ती पाहता बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड व त्याने पोसलेले कुख्यात गुंड हे माणसाच्या नावाला कलंक ठरत आहेत. या सर्वांना तातडीने फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी बापु शिंदे यांनी केली आहे.
यावेळी शेगाव दुमाला चे सरपंच किरण आटकळे, पिंटू मोरे, माऊली आबा काळे, धनंजय लकडे, नागेश जाधव, बंटी परचंडे, पवन खंडागळे, माऊली नायको यांचेसह अनेकजण उपस्थित होते.
..................
Tags
सामाजिक वार्ता