माळशिरस प्रतिनिधी --
शिक्षक सहकार संघटनेची माळशिरस तालुका अध्यक्षपदी नागनाथ बळवंतरावतर सरचिटणीसपदी नितीन गाडे याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हित,समाज हित,शिक्षक हित याअनुक्रमे काम करणारी एकमेव शिक्षक सहकार संघटना महा.राज्य असून शिक्षक व शिक्षक सहकार संघटना यांचही नातं घट्ट करणारा हा दिवस
माळशिरस तालुक्यातील बांधवासाठी महत्वपूर्ण ठरला आहे.
शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या अध्यक्षतेखाली , जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र जेटगी,राज्य मुख्य
संघटक विठ्ठल टेळे, राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांच्या उपस्थित संघटनेची सभा जिल्हा सोसायटी माळशिरस येथे पार पडली.
सभेची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नवनाथ धांडोरे, रावसाहेब वाघमारे व बाळासाहेब लोखंडे यांनी केले.सभेचे प्रास्ताविक गणेश देशमुख यांनी केले. आजपर्यंत संघटनेने शिक्षकांचे सोडवलेले प्रश्न यावर विचार व्यक्त केले.
राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांनी नूतन तालुका पदाधिकारी निवडी बहुमताने जाहीर केल्या.तसेच इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे निवड करण्यात आले तालुका अध्यक्ष
नागनाथ हनुमंत बळवंतराव, तालुका कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब ज्योतीराम लोखंडे, तालुका उपाध्यक्ष केशव सुभाष अभंगराव ,ज्ञानेश्वर आनंद सर्जे ,तालुका कोषाध्यक्ष माणिक नामदेव करडे ,तालुका सहकार्याध्य सतिश भगवान बरळ, तालुका सरचिटणीस नितीन अजिनाथ गाडे, तालुका संपर्कप्रमुख सचिन शिवाजी वलेकर ,संतोष ज्ञानेश्वर धोत्रे ,तालुका संघटक सुबोध गौतम काटे सोमनाथ वामन कांबळे ,तालुका प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब सुखदेव भोसले सूर्यकांत, बळीराम जाधव,सोलापूर जिल्हा प्रतिनिधीपदी गणेश दगडू देशमुख यांची निवड करण्यात आली.सर्व नूतन तालुका पदाधिकारी यांचे नूतन तालुका अध्यक्ष नागनाथ बळवंतराव यांनी आभार व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील सहकार प्रेमी बांधव उपस्थित होते.
शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्यसरचिटणीस निलेश देशमुख, राज्यउपाध्यक्ष मनोज कोरडे,
राज्यकोषाध्यक्ष रमेश आलापुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख गजानन देवकते,महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष सुवर्णा गाडे, जिल्हाकार्याध्यक्ष आबासाहेब तरंगे, जिल्हासरचिटणीस सचिन निरगुडे, जिल्हाप्रसिद्ध नेहरू राठोड,पुणे विभाग सरचिटणीस संजय दवले, राज्यसंघटक विठ्ठल टेळे यांनी अभिनंदन केले.
Tags
सामाजिक वार्ता