मोहोळचा कलाकार अमोल महामुनी रुपेरी चंदेरी पडद्यावर झळकला

 ''पारू ,लाखात एक आमचा दादा ,आप्पी आमची कलेक्टर '' झी मराठी मालिकेत विविध भूमिकेत..
  
 मोहोळ (प्रतिनिधी) :
 ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडं म्हणलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात."वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते. जीवनात तर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करणे चालूच ठेवावे लागेल जो पर्यंत तुम्ही ध्येयापर्यंत जात नाही. असाच एक अवलिया कलाकार अमोल महामुनी ज्यांनी गणपती उत्सवातील सजीव देखाव्यातून अभिनयाची सुरवात केली न थांबता नाटक , पथनाट्य , एकांकिका , लघूपट , चित्रपट ,समाज जागृती अभियान ,यात्रा महापुषाची जयंती गणपती ,नवरात्र ,आदीच्या माध्यमातून विविध नाटकात आपल्या अभिनयातून कला सादर करून अभिनय केलेला आहे.* 
  आजवर गाजलेली नाटके जिचा नवरा सरपंच तिचा वाऱ्यावर गेला प्रपंच ,नाद माझा केला मातीत गेला ,वंशाची पणती ,माझं काय चुकलं ,पथनाट्य माझं काय चुकलं ,एक हि भूल ,नाटक गाव लय बराच ,लघुपट वहिवाट ,चित्रपट सिनेमायेडा माहितीपट बारव लघुपट हॅपी वाला बड्डे याच बरोबर हर घर तिरंगा ,मतदान माझा हक्क ,ग्लोबल रुबेला आदींच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती सोप्या पद्धतीने नागरिकांना अभिनयाच्या माध्यमातून समजावून प्रचार व प्रसार केला.
   विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. झी मराठी वरील ' लाखात एक आमचा दादा ' पारू ' आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत विविध भूमिका साकारत आहेत.लहानपणी अशोक सराफ ,दादा कोंडके ,महेश कोठारे ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर यांचे सिनेमे पाहून आपुन सुद्धा एक दिवस टेलिव्हिन वरती दिसणार ही खुणगाठ मनाशी बाळगून चालू केलेला प्रवास त्यांनी आज झी मराठी वरील मालिकेतील  भूमिकेच्या माध्यमातून संपूर्ण  भारतातील मराठी माणसाच्या मनात व घरात पोहचलेले आहेत. 
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबात जन्म झालेले ज्यांनी फक्त जिद्द मनाशी बाळगून आपणही एक दिवस चंदेरी दुनियेतील छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पडायची आणि गावाचे नाव जगभर करायचे अशी मनाशी खुणगाठ बांधली होती. आपलं ध्येयापर्यंत पोहचून चित्रपट ,नाटक ,मालिकेच्या माध्यमातून सर्वानी आपली कला पाहावी ही इच्छा पूर्ण झाली आहे. यापुढेही विविध भूमिकेच्या माध्यमातून आपली कला सादर करत राहणार असल्यांचे सुतोवाच केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form