आंतरराष्ट्रीय ग्लोबल ऑयकाॅन पुरस्कार 2025 ने सन्मानित होणार भारतातून या पुरस्कार फक्त ३० जणांची निवड झाली आहेत.
पंढरपूर(प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील लोकप्रिय युवक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना श्रीलंका(कोलंबो) येथे आंतरराष्ट्रीय ग्लोबल ऑयकाॅन पुरस्कार 2025 मिळणार आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली असल्याचे दिसत आहे.कोलंबो येथील बंडारनाइके मेमोरियल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हॉल ३१ जानेवारी येथे संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहेत.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे देशाचे मिनिस्टर्स व मा.मंत्री येणार आहेत तसेच प्रसिद्ध अभिनेते व मोठे बिझनेस लोक या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.
भारतातून या पुरस्कार फक्त ३० जणांची निवड झाली आहेत.यामध्ये आपले पंढरपूर चे डाॅ.मुजम्मील कमलीवाले(समाजसेवक) यांची निवड झाली आहेत.या मध्ये काही देशामधुन हि पुरस्कारार्थी येणार आहेत.
मुजम्मील कमलीवाले हे पंढरपूर शहरातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. अनेक गरीब लोकांना रोजी रोटीचीही भ्रांत होती.अशा गरीब लोकांचा शोध घेऊन त्यांना अन्नदान करण्याचे काम त्यांनी केले होते.समाजातील गरीब जगत असलेल्या शैक्षणिक सोयी सुविधा नसलेल्या मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले आहेत.समाजातील उपेक्षितातील उपेक्षित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.आणी अजुनही सुरू आहेत.त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार म्हणून सर्व स्तरातून कौतुक होत आहेत
Tags
सामाजिक वार्ता