पंढरीच्या संगीत विशारद व सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. शुभांगीताई (राधामाई)‌ मनमाडकर यांच्या ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...


पंढरपूर  प्रतिनिधी -  
पंढरपुरा शहरांतील संगीत क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणारे व संगीत विशारद या पदाचे मानकरी असणाऱ्या व तसेच संस्कार भारती या संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ शुभांगीताई (राधामाई) मनमाडकर ६१ अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्य साधून पंढरपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे केल्याची माहिती पंढरपूर शहरातीधील  मंडप कॉन्ट्रॅक्टर लाईट डेकोरेशन साऊंड साऊंड सिस्टिमचे सुप्रसिद्ध आरती मंडप कॉन्टॅक्टर चे सर्वेसर्वा श्री भगवान‌भाऊ नारायणराव मनमाडकर यांनी दिली.                                    

सदर ६१ अभिष्टचिंतन सोहळा सौ कल्याणी नामजोशी पुणे व ह.भ.प श्री संत डॉ.जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांच्या प्रमुख
उपस्थिती मध्ये होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडियन आयडॉल विजेती कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे मुंबई हिचा स्वर ज्ञानेश्वरी भक्ती अभंग नाट्यसंगीत आधी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रम वैकुंठवासी डॉ. दादा महाराज मनमाडकर नगर पंढरपूर या ठिकाणी बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी  दुपारी ४ वाजता संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भगवान भाऊ मनमाडकर यांनी केले असून कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था सायंकाळी ७ वाजल्यापासून केले. असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाडकर परिवारातील आरती मनमाडकर, पल्लवी मनमाडकर,चि.समय मनमाडकर, सर्वश्री निरंजन महाराज मनमाडकर धनंजय मनमाडकर व कु.निष्ठा मनमाडकर आदीसह सर्व कर्मचारी बंधू परिश्रम घेत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form