पंढरपूर प्रतिनिधी--
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी) प्रणित भव्य महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या न भूतो न भविष्यती सोहळ्याला लाखो सेवेकरी व भाविक उपस्थित राहणार आहेत.
हा भव्य दिव्य सोहळा २१जानेवारी२०२५ वार मंगळवार रोजी असून परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सकलकार्य-सिद्धीकारक श्री चक्रराजपूजन व श्री यंत्राचे पूजन होणार आहे.बारावे
ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घृष्णेश्वर,वेरुळ नजीकच्या गंगापूर तालुक्यातील धुळे-सोलापूर महामार्गालगत दिवशी गावाच्या हद्दीत हा सोहळा होणार असून,यासाठी सुमारे ४० एकर जागेचा उपयोग करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड येथील जिल्हा प्रतिनिधी व सेवेकऱ्यांनी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
सेवेकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी उत्तम व्यवस्थेची योजना करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी
मंडप उभारण्यात येत असून स्वतंत्र पार्किंग
साठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
आहे.बाहेरगावाहून येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जात आहे.तसेच, कार्यक्रम
स्थळी पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. आहे.दिवशी गावातील नागरिकांनी सुमारे ३५ ते ४० एकर शेत जमीन विनामुल्य उपलब्ध करून देऊन या सोहळ्याला मोलाचे सहकार्य दिले आहे.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजना
साठी सात लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे.तर छत्रपती संभाजीनगर,
जालना,बीड,सोलापूर आणि इतर जिल्ह्यांतून,महाराष्ट्रातुन लाखो सेवेकरी व भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
Tags
धार्मिक वार्ता