सोलापूरचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे...

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित  पवार हे पुणे व बीडचे व एकनाथ शिंदे हे मुंबई व ठाण्याचे पालकमंत्री*
पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकी
नंतर राजकीय वर्तुळात कोण कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्यातच आज शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी याबाबत परिपत्रक काढत पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली .
 
आज राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापने नंतर राज्यात विविध ठिकाणी पालकमंत्री पदासाठी विशेष उत्सुकता लागून राहिलेल्या कोण होणार पालकमंत्री या टिस्टचा अखेर गोड झाला.शनिवारी शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी याबाबत परिपत्रक काढत पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे पुणे व बीडचे तर एकनाथ शिंदे हे मुंबई व ठाण्याचे पालकमंत्री असल्याचा समावेश आहे .तर सोलापुरात महायुतीचे राज्याचे सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीसोलापूरच्या पालकमंत्री पदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते .सोलापूर जिल्ह्याला प्रथमच युथ आयकॉन चेहरा जयकुमार गोरे यांच्या रूपात मिळाल्याने सोलापूरकरांना गोरे यांच्या कडून विकासाच्या दृष्टीकोनातून विशेष अशी अपेक्षा आहे.या निवड प्रक्रियेबद्दल विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी , शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form