पंढरपूर प्रतिनिधी--
शहरातील शाळा स्नेहसंमेलनाची धूम सुरू आहे.स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सर्व शाळा डिसेंबर व जानेवारी महिन्यांत वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते.सध्या त्यांचीच धूम सुरू आहे.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिरे येथे दिनांक 9 व 10 जानेवारी या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण गाण्यांची रेलचेल होती. त्यामध्ये कन्नड गीत चन्नाप्पा चन गौडा व कंदे अदर अंते हे तेलगू गीत सादर करण्यात आले. गाण्यातील मनमोहक संगीत व ठेक्यावर सादरकर्त्यांसह प्रेक्षकही डोलत होते. यासोबतच खंडोबारायाचे याडं बाई या गाण्यातील सादरीकरण व दृश्य सजावट यामुळे प्रेक्षकांना जणू गडावरच असल्यासारखे वाटत होते. बाईपण भारी देवा, दैवत छत्रपती , मी आले, मल्हार मल्हार, लल्लाटी भंडार इ. ६० हून अधिक गाणी कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर, शाखाप्रमुख रजनी देशपांडे, वर्ग शिक्षिका अन्नपूर्णा धायगोंडे नीता तरळगट्टी, सुजाता कुलकर्णी, सोनाली आगावणे, सुवर्णा सपकाळ, सुरेखा शिंदे, संगिता कोकणी, दळवी मॅडम सर्व सहशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मुंडे व आशा पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना पालकांची उपस्थितांनी दाद दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला.पालक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले म्हणाले स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. त्यांना चांगले नागरिक बनवले पाहिजे. त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले गेले पाहिजेत.या शाळेचे पंढरपूर स्तरातून कौतुक होत आहेत
Tags
शैक्षणिक वार्ता