मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते अमित अवघडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा...

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरीतील समाजसेवक अमित अवघडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा,
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या शुभहस्ते पार पडला. 

याप्रसंगी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी,समाजसेवक बाबा चव्हाण आणि नगरसेवक अंबादास वायदंडे,कृष्णा वाघमारे, किशोर खिलारे ,बाबा घाडगे,महेश वाघमारे,अविनाश अवघडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पंढरीतील समाजसेवक अमित अवघडे यांचा वाढदिवस पंढरीचा मोठ्या थाटात संपन्न झाला. पंढरपूर ही तीर्थक्षेत्र नगरी आहे.
या ठिकाणी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे या ठिकाणी
लोकसंख्येची कायमच दाटी असते. यामुळे येथे रुग्णवाहिकांची कायमच कमी असते. येथील भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमित अवघडे मित्रमंडळाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली.अमित अवघडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या शुभहस्ते , या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी
पंढरीत थाटात पार पडला.यावेळी समाजसेवक अमित अवघडे यांच्यासह अमित अवघडे मित्रमंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form