पंढरपूर प्रतिनिधी--
माघ यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 08 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा होत आहे. माघ यात्रेत येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत असून, पालखी, दिंडी धारकांसाठी प्लॉटसची नोंदणी सुरु आहे. दि. 04 फेब्रुवारी पर्यंत 165 दिंड्याची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.
माघ यात्रेला येणाऱ्या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. या ठिकाणी एकूण 497 प्लॉट्स असून त्यापैकी वापरायोग्य 450 प्लॉटस आहेत. हे प्लॉटस भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते..भाविकांना प्लॉटस वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत.
दिंडी, पालखी समवेत येणाऱ्या भाविकांना भक्तीसागर (65 एकर) येथे प्लॉटसचे वाटप सुरु असून, या ठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार आहेत. आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नायब तहसिलदार विजय जाधव (मो.क्र. 8275202155), सुधाकर धाईंजे (मो.क्र.9767248210), तसेच सहाय्यक प्रमोद खंडागळे (मो.क्र. 9657290403) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी श्रभ् इथापे यांनी केले आहे.
0000000
Tags
धार्मिक वार्ता