पंढरपूर: दि.११.४.२५
आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री.आलोक कुमारजी यांचा संत संपर्क दौरा पार पडला . यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायातील प्रमुख फडकरी, दिंडी प्रमुख, मठाधिपती व काॅरीडाॅर बाधीत नागरिक यांच्याशी संवाद साधला.
पुर्व नियोजीत संतसंपर्क अभियानांतर्गत *श्री.आलोक कुमार जी* आज पंढरपूर मध्ये आले होते.यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर , मंदिर परिसरात पाहणी केली, व श्री संत कबीर महाराज मठ येथे बैठक घेतली. विश्व हिंदू परिषद हि हिंदूंच्या हक्कांसाठी बांधील असून सरकार कोणत्याही पक्षाचे असो मंदिर चालवणे हे सरकारचे काम नाही.कोणतेही इतर धर्मिय प्रार्थनास्थळ जर सरकार ताब्यात घेत नसेल तर फक्त हिंदूंचीच मंदिरे सरकार का ताब्यात घेते ? सरकारने मंदिरे हि भक्तांच्या ताब्यात द्यायला हवीत यासाठी नुकतेच विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अभियान सुरु करण्यात आले असुन.विजयवाडा येथे अडीच लाख हिंदू बांधवांनी मोर्चा काढून या अभियानाची सुरुवात केली, आहे. लवकरच सरकारला सर्व मंदिरे मुक्त करावी लागतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
तसेच नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यांत पंढरपूर काॅरीडाॅर च्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याच्या घोषणेवर चर्चा करताना वारकरी संप्रदायातील महाराज मंडळीं व उपस्थित नागरिक यांना आश्वस्थ करताना ते म्हणाले कि आम्ही वारकरी व नागरीक यांच्या सोबत आहोत . सरकारने कोणताही विध्वंसक आराखडा राबवू नये, आपल्या आराखड्यावर पुनर्विचार करावा व नागरीकांच्या दिलेल्या आराखड्यावर विचार करुन निर्णय घ्यावा.मात्र विश्व हिंदू परिषद कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या हक्कांवर बाधा येऊ देणार नाही यासाठी तुमच्या सोबत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. तसेच वारकरी संप्रदायास वारी कालावधीत लागणाऱ्या सोयी सुविधा साठी , चंद्रभागा शुद्धीकरण, तीर्थक्षेत्र मद्यमांसमुक्ती या साठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत ह.भ.प.देवव्रत राणा महाराज वासकर,डाॅ.महेश महाराज देहूकर, चवरे महाराज,वीर महाराज, यांनी वारकरी संप्रदायाच्या वतीने तर नागरिकांच्या वतीने श्री.ह्रषीकेश उत्पात, अभयसिंह इचगावकर,बाबा महाजन, यांनी भुमिका मांडली.बैठकीचे सुत्रसंचलन व समन्वय विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क प्रमुख ह.भ.प.माधवदास महाराज राठी यांनी केले. सदर बैठकीस कबीर महाराज, शिरवळकर महाराज,श्रीकांत हरिदास महाराज
राशिनकर महाराज, औटी महाराज, बागडे महाराज,उखळीकर महाराज,इ.वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी व पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव समितीचे कौस्तुभ गुंडेवार,गजानन भिंगे, बिडवे, गणेश महाजन, योगेश बडवे, निलेश महाजन, गणेश लंके, इ.नागरिक तसेच विश्व हिंदू परिषदेचे नागनाथजी बोंगरगे, रविंद्र साळे, रामेश्वर कोरे, इ.कार्यकर्ते व बजरंग दलाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता