उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा -- समाधान आवताडे

आ.समाधान आवताडे यांनी दिल्या भिमा पाठबंधारे  आणि नीरा भाटगर विभागाला सूचना..
पंढरपूर/प्रतिनीधी 
सध्या उन्हाळा मोठया प्रमाणात जाणवत आहे. यामुळे पाण्याची भीषण टंचाई होणार आहे. यामुळे पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी भिमा पाटबंधारे आणि निरा भाटगर विभागाने घेण्यासाठी योग्य त्या उपययोजना कराव्यात आशा सूचना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या आहेत.

   गुरुवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भीमा पाटबंधारे आणि निरा भाटघर विभागातील संबंधित सर्व अधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 
  माण नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत .ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्यात यावे अशा सूचनाही देण्यात आल्या.

  या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील  गावातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीमध्ये या उपस्थित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील पाणी प्रश्न संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या.

   वाखरी आणि गादेगाव या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी ओढ्याच्या काठावर असल्यामुळे त्या ओढ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे . उंबरगाव, बोहाळी, कोर्टी ओढ्यासह जांभूळबेट ओढ्यालाही पाणी सोडून देण्याची  सूचनाही आमदार आवताडे यांनी यावेळी केली.
   ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडचण होत आहे. ती अडचण दुर करण्यासाठी मशीनने वापर करून शेतकऱ्याना पाणी पोहचवा असेही सुचित कऱण्यात आले आहे.
   या बैठकीचे वेळीं भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे सो, उपकार्यकारी अभियंता इंगोले मॅडम, मीरा भाटकर विभागाचे उप अभियंता पासलकर सो, विविध भागातील कर्मचारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form