पंढरपूर प्रतिनिधी :
आज अकलूज येथे शिक्षक सहकार संघटना शाखा माळशिरस चा गुणवंत आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार सोहळा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती त संपन्न झाला.
या प्रसंगी राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांनी खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रनिर्माण आदर्श शिक्षिका पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रतिभावंत कलाकार पुरस्कार, अष्टपैलू खेळाडू पुरस्कार, उत्कृष्ट कलाकार पुरस्कार, व जिल्हा स्तर कला, क्रीडा स्पर्धा विजेता प्राप्त शिक्षक पुरस्कार यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पुढे ते म्हणाले की, ए आय या टेक्नॉलॉजी च्या जमान्यात विद्यार्थी हा सक्षम, संस्कारक्षम बनायला हवा त्यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे, सोबतच शिक्षक सहकार संघटना च्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील शिक्षकांसाठी नविन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. शिक्षक बांधवानी टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम राबवावा, विद्यार्थी यांनी सर्व प्रकारच्या बियांचे संकलन करून, शाळेकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्षारोपण करावे, जेणेकरून पर्यावरण समतोल व पर्यावरण संवर्धन यासाठी मदत होईल, असे सांगितले.
या प्रसंगी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य
सरचिटणीस निलेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष मनोज कोरडे, राज्य संघटक विठ्ठल टेळे, जिल्हा अध्यक्ष रविराज खडाखडे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सुवर्णा गाडे उपस्थित होते.यावेळी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन खासदार साहेबांना दिले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तालुका अध्यक्ष नागनाथ बळवंतराव यांनी प्रास्ताविक केले. माळशिरस तालुक्यातील त्र्याहत्तर शिक्षक -शिक्षिका यांना विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन राज्यकार्याध्यक्ष, दिपक परचंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गाडे, सुबोध काटे, दादासाहेब भोसले, ज्ञानेश्वर सर्जे, सचिन वलेकर, सतीश बरळ, बाळासाहेब लोखंडे, केशव अभंगराव, सूर्यकांत जाधव, सोमनाथ कांबळे, गणेश देशमुख, माणिक करडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती माळशिरस च्या पदाधिकारी यांचे राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांनी आभार मानले.
Tags
सामाजिक वार्ता