पंढरपूर प्रतिनिधी --
नितीन दत्तात्रय मोरे यांची सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल नेहरू युवा मंडळ कोंढारकी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पोलीस सचिन मांजरे अजय घाडगे होतेतर कार्यक्रमाप्रसंगी डिगंबर दांडगे पोपट दांडगे अज्ञान दांडगे आप्पासो दांडगे आनंद दांडगे शिवाजी दांडगे समाजसेवक राम पाटील नितीन दांडगे पांडुरंग लाटे कोंढारकी ग्रामस्थ , नेहरू युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे बोलताना म्हणाले की कोंढारकी हे गाव पंढरपूर मंगळवेढा दोन तालुक्यांमध्ये बांधकाम व्यवसायात नावाजलेली आहे कोंढारकी गावचे जावई नितीन मोरे यांची सरकारी इंजिनिअर पदी निवड झाल्याबद्दल कोंढारकीतील बांधकाम व्यवसायिकांना सरकारी कामांमध्ये काम करण्याची संधी निश्चितच मिळणार सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Tags
सामाजिक वार्ता